"WELCOME TO BHAGWANGAD" ||JAY BHAGWAN||'श्री ||संत भगवानबाबा|| ||श्रीक्षेत्र भगवानगड||
The Heaven on earth Discovered by shree sant Bhagwanbaba.

Bhagwangad Night Look Very prettiest as like really a Heaven very Good Location To see..
||Jay Bhagwan.||

HAPPY INDEPENDENCE DAY

सर्वांना भारयीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेछया 

The place on the earth founded by the GOD of vanjarians i.e. Saint Bhagwanbaba has ever unseen

श्री संत भगवानबाबा


श्री संत भगवानबाबा

आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा (जन्म : २९ जुलैइ.स. १८९६ सुपे सावरगाव घाट, पाटोदा, बीड मृत्यू : १८ जानेवारीइ.स. १९६५ रुबी हॉल क्लिनिकपुणे

हे श्री संत भगवानबाबा  महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत आहेत. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नंतरच्या कालखंडात संतपदाला पोहोचलेले ते पहिले महापुरुष आहेत. त्यांना स्वतः तुकाराम महाराज यांनीच स्वप्नबोध केला होता असे मानले जाते. तुकारामोत्तर कालखंडात वारकरी धर्माला प्रेरणा देण्याचे महान कार्य त्यांनी केले. ते संत एकनाथांच्या परंपरेतील नाथफडाचे/पैठणकर फडाचे प्रसिद्ध टाळकरी संत होते. ते भागवत धर्माचा झेंडा फडकाविणारे एक प्रबोधनकर्ते कीर्तनकार होते. त्यांच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की त्यांनी पाण्यावर तरंगून ज्ञानेश्वरीचे पारायण केले होते. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठगमन केले. प्राणत्याग करताना त्यांनी वारकरी महावाक्याचा जयघोष केला.
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडाविदर्भ ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा त्यांच्या काळातील समाजावर फार मोठा प्रभाव पडलेला होता व तो तेवढाच परिणामकारकपणे आजही अनुभवास येतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समाज आहे. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली. सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धानिर्मूलन, शिक्षणप्रसार, वार्षिक नारळी हरिनामसप्ताह, पंढरपूरवारी यासारखे जनकल्याणचे काम करणारे एक आदर्श समाजमार्गदर्शक, समाजसुधारक होते. भगवानगडाची संस्थापना त्यांनी केली. भगवानगड आज वारकरी धर्म चळवळीचे मोठे केंद्र बनले आहे. [

"भगवानगड " प्रत्यक्षात उतरवण्याचे महान कार्य श्री संत भगवान बाबा यांनी केले. या गडाचा इतिहास फार पूर्वीचा आहे. पांडवाचे गुरु ' धौम्य ऋषी ' यांचे हे वास्तव्य स्थान. धौम्य नावाचा अपभ्रंश झाल्याने या डोंगरास धुम्या डोंगर असेही संबोधले जायचे. तेथे त्यांच्या पादुका आहेत.जवळच केदारेश्वराचे मंदिर रंग ऋषीच्या तपश्चर्येचे ठिकाण आहे. याच ठिकाणी भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे वास्तव्य ,हरिहरेश्वराचे भव्य मंदिर आणि जनार्दन स्वामीची समाधी आहे . अशा सप्त ऋषीचा वास असणाऱ्या परिसरात हा गड उभा आहे.

JAY BHAGWAN

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा