"WELCOME TO BHAGWANGAD" ||JAY BHAGWAN||'श्री ||संत भगवानबाबा|| ||श्रीक्षेत्र भगवानगड||

सर्वांना गुढीपाडवा व हिंदुनववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..।।

नवे वर्ष, नव्या कल्पना नवे स्वप्न, नव्या आशा नवी पालवी, नवी दिशा.... यशाला गवसणी, आरोग्य नांदो जीवनी.. मनात फुलू कारंजी घालते तिथे रुंजी... पुऱ्या व्हाव्यात साऱ्या इच्छा, नव्या वर्षाच्या मनःपूर्वक सदिच्छा.... !!! आपणास व कुटुंबीयास... ! गुढी-पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩🚩🚩🚩💐💐 ।। श्री क्षेत्र भगवानगड ।।

भगवानगडावर वसतिगृह सुरु करणार - महंत

*भगवानगडावर वसतिगृह सुरु करणार - महंत नामदेव शास्त्री* भगवानगड: क्षेत्र भगवानगडावर इयत्ता ८वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १ मे २०१८ पासून वसतिगृह सुरु करणार असल्याची माहिती गडाचे महंत न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी दिली आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक संत भगवानबाबा यांनी १ मे १९५८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते श्री क्षेत्र भगवानगडावर गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केले होते. परंतु पुरेशा पाण्याअभावी ते वसतिगृह स्थलांतरित करावे लागले. श्री क्षेत्र भगवानगडावर गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असावे, ही भावना श्री संत भगवानबाबांची होती. गुरुवर्य बाबांच्या या इच्छापूर्तीसाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी श्रीगुरु शास्त्रीजींनी सामाजिक भावनेतून हा निर्णय घेतला आहे. तरी समाजामध्ये जे गरीब व होतकरु विद्यार्थी असतील त्यांनी या वसतिगृहाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे. आतापर्यंत श्रीगुरु शास्त्रीजींनी भगवानगडावरील भौतिक विकासकामांबरोबरच स्वतः परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या माध्यमातून शेकडो युवा कीर्तनकार घडवले आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी पी.एच.डी. करत आहेत तर काहीजण पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. श्रीगुरु शास्त्रीजींच्या या लोककल्याणकारी निर्णयामुळे भगवानगडावर घडवले जाणारे विद्यार्थी आयुष्यभर निर्व्यसनी राहून नक्कीच आचार व विचारसंपन्न बनतील यात तीळमात्र शंका नाही. प्रथम वर्ष असल्यामुळे यावर्षी फक्त ३० ते ४० निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ऊसतोड कामगारांच्या निस्सीम श्रद्धेने चालणारा भगवानगडच गरिबांचा कैवारी ठरला हे मात्र नक्की.

JAY BHAGWAN

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा