
भगवानगडावर वसतिगृह सुरु करणार - महंत
*भगवानगडावर वसतिगृह सुरु करणार - महंत नामदेव शास्त्री*
भगवानगड
: क्षेत्र भगवानगडावर इयत्ता ८वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी १ मे २०१८ पासून वसतिगृह सुरु करणार असल्याची माहिती गडाचे महंत न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी दिली आहे.
श्री क्षेत्र भगवानगडाचे संस्थापक संत भगवानबाबा यांनी १ मे १९५८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते श्री क्षेत्र भगवानगडावर गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु केले होते. परंतु पुरेशा पाण्याअभावी ते वसतिगृह स्थलांतरित करावे लागले. श्री क्षेत्र भगवानगडावर गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असावे, ही भावना श्री संत भगवानबाबांची होती. गुरुवर्य बाबांच्या या इच्छापूर्तीसाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी श्रीगुरु शास्त्रीजींनी सामाजिक भावनेतून हा निर्णय घेतला आहे. तरी समाजामध्ये जे गरीब व होतकरु विद्यार्थी असतील त्यांनी या वसतिगृहाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे. आतापर्यंत श्रीगुरु शास्त्रीजींनी भगवानगडावरील भौतिक विकासकामांबरोबरच स्वतः परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या माध्यमातून शेकडो युवा कीर्तनकार घडवले आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी पी.एच.डी. करत आहेत तर काहीजण पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. श्रीगुरु शास्त्रीजींच्या या लोककल्याणकारी निर्णयामुळे भगवानगडावर घडवले जाणारे विद्यार्थी आयुष्यभर निर्व्यसनी राहून नक्कीच आचार व विचारसंपन्न बनतील यात तीळमात्र शंका नाही. प्रथम वर्ष असल्यामुळे यावर्षी फक्त ३० ते ४० निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ऊसतोड कामगारांच्या निस्सीम श्रद्धेने चालणारा भगवानगडच गरिबांचा कैवारी ठरला हे मात्र नक्की.

Subscribe to:
Post Comments (Atom)
JAY BHAGWAN
राष्ट्रसंत श्री.भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
राष्ट्रसंत श्री.भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!!!! जमिनी विका,पण पोरं शिकवा'... हा मौलिक संदेश देऊन उपेक्षित समाजाला...
-
भीमसिंह महाराज ( जन्म - इ.स. १९२३ नेकनूर, बीड मृत्यू - ९ नोव्हेंबर , इ.स. २००३ ) हे महाराष्ट्रातील एक संत , प्रवचनका...
-
Bhagwan Baba is a great saint of the Vanjari Community in Maharashtra. His Punyatithi or death anniversary is annually observed in Paush ...
-
*अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत* *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी* *महाराजांच्या जयंतीनिमित्त* *सर्व शिवभक्तांना हार्दिक शिवमय शुभेच्छा..* 🚩 *!!...
No comments:
Post a Comment