"WELCOME TO BHAGWANGAD" ||JAY BHAGWAN||'श्री ||संत भगवानबाबा|| ||श्रीक्षेत्र भगवानगड||

भगवानगड

श्री क्षेत्र भगवानगड इतिहासनाव:श्रीक्षेत्र भगवानगड मंदिर
गुरु परम्परा=सन्त एकनाथ महाराज
निर्माता:अनामिक
जीर्णोद्धारक:भगवानबाबा
निर्माण काल :प्राचीन
देवता:विठ्ठलधौम्य ऋषी
वास्तुकला:हिन्दू
स्थान:महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीतालुका

श्रीक्षेत्र "भगवानगड" (अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व) हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणमहा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामीभगवानबाबा वभीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते. [१]

इतिहाससंपादन करा

धौम्य ऋषीच्या मंदिर
सदगुरू जनार्दनस्वामी समाधी
या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्यऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण 'धौम्यगड' किंवा 'धुम्यागड' म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषीभारद्वाज ऋषी,शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे.
काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरु होतो.

धौम्यगडाचा जीर्णोद्धारसंपादन करा

यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वत: वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वत:चे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वत:च्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खर्‍या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खर्‍या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.
पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वतीह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्तेविठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत.[१]

मंदिराची रचनासंपादन करा


श्रीक्षेत्र भगवानगड
श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्रहनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत. या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्यऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामीयांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्रहनुमानाचे पुरातन मंदिर आहे.
येथे ह.भ.प. ऎश्वर्यसंपन्न, परमविठ्ठलभक्त श्री संतभगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या संगमरवरी पाषाणबांधणीच्या समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणामार्ग अरुंद आहे. समाधीसाठी येथील केलेली खास योजना लक्षही वेधुन घेते. सूर्योदयासमयी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून समाधीगाभाऱ्यापर्यंत पोहचतात. ज्ञानेश्वरींचे भाष्यकार भगवानबाबांनी आयुष्यभर आध्यात्मिक विचार कीर्तनाच्या माध्यमातून भक्तगणांपर्यन्त पोहचविला. बाबांचे प्रेमळ व्यक्तिमत्व यामुळे त्यांचा भक्तगण परिवार फार मोठा आहे. भक्तगणांनी भगवानबाबाचे वास्तव्य केले ते निवासस्थान श्रद्धापूर्वक जतन केले आहे
समाजकल्याणासाठी , जनहितासाठी अवघ्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी ,सर्व समाज तळागाळातून जागा होण्यासाठी अध्यात्मिक क्रांतीची गरज होती आणि हीच गरज "भगवानगड" स्थापन करून भगवान बाबांनी अध्यात्मिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.

"भगवानगड " प्रत्यक्षात उतरवण्याचे महान कार्य श्री संत भगवान बाबा यांनी केले. या गडाचा इतिहास फार पूर्वीचा आहे. पांडवाचे गुरु ' धौम्य ऋषी ' यांचे हे वास्तव्य स्थान. धौम्य नावाचा अपभ्रंश झाल्याने या डोंगरास धुम्या डोंगर असेही संबोधले जायचे. तेथे त्यांच्या पादुका आहेत.जवळच केदारेश्वराचे मंदिर रंग ऋषीच्या तपश्चर्येचे ठिकाण आहे. याच ठिकाणी भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे वास्तव्य ,हरिहरेश्वराचे भव्य मंदिर आणि जनार्दन स्वामीची समाधी आहे . अशा सप्त ऋषीचा वास असणाऱ्या परिसरात हा गड उभा आहे.

"समाजाचे आपण काही देणे लागतो , जे मिळेल तेवढे , किंबहुना त्याही पेक्षा अधिक असे काही समाजाला द्यावे की ज्या मूळे समाजाचे कल्याण होईल " या तत्वावर भगवान बाबांनी भगवान गड साकारला .बाबा वास्तुशास्त्रात निपुण होते लाकडाचा वापर न करता संपूर्ण कामासाठी दगड वापरण्याचे बाबांनी ठरवले होते . ओवऱ्यासाठीचे दगडी खांडे नवगण राजुरी येथील राजूबाइच्या डोंगरावरून आणण्यात आली . हजारो वर्ष्या पासून पडलेल्या दगडी गोट्यांना चौकोनी चीर्यांचे रूप देण्यात आले .स्वतः बाबा परिसरातल्या सर्व घरा घरात फिरून गडाच्या बांधकामासाठी मदत मागत होते .जसे शक्य होईल त्या प्रकारच्या मदतीचे आवाहन ते समाजाला करत होते . समाजातून त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. रामाला जसे सेतू बांधताना खारीचीही मदत मोठी वाटली तसे भगवान बाबाला तन मन धनाने काम करणारे बांधव भेटले . स्त्रिया आपले अलंकार,आभूषणे बाबांना देत . घरून भाकरी आणून गडावर काम करणाऱ्यांची भूक भागवत होत्या.कसल्याही प्रकारची मजुरी न घेता परत जात होत्या . गडाचे काम चालू असताना गडावर पिण्याच्या पाण्यासाठी आसपासच्या गावांनी बैल गाड्यातून पाणी आणण्याची सोय केली होती . प्रत्येक गावाने एक दिवस पाणी पुरवण्याचा नेम ठरला होता . पारगाव, मालेवाडी,काटेवाडी , दैत्या नांदूर , सोनाशी ,कोनोशी, येळी अशा परिसरातील अनेक गावातून लोक गडासाठी काम करण्यास येत असत. गडाचे काम खूप भव्य असे होते. "आपल्याला प्रत्येक कामात भगवंतच मदत करतो " असा पूर्ण विश्वास असला पाहिजे असे बाबा सांगत. गडाच्या कामात कधीही कमी पडली नाही .प्रत्येक गाव गडासाठी लोकवर्गणी जमा करायचा .गडावर काम करणाऱ्यांची गर्दी होत असे.
पाहता पाहता गडाचे काम पूर्ण झाले . भव्य दिव्य वास्तू उभी राहिली. अध्यात्माबरोबर शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वतंत्र इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला . पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतीष्टा करण्यासाठी 'स्वामी सहजानंद सरस्वती महाराज ', ह.भ.प.मामासाहेब दांडेकर, मा. बाळासाहेब भारदे यांना, तसेच गडाच्या उद्घाटनासाठी त्या वेळेचे मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले , आणि १ मे १९५८ या दिवशी गडाचा भव्य उद्घाटन सोहळा साजरा करण्याचे ठरले.

लोककल्याणासाठी चाललेल्या या कामात खंड पडू नये या साठी वाटेल ते करण्याची लोकांची तयारी होती. उद्घाटनाचा सोहळा हा शाही इतमातच पार पडायचा हा लोकांचा आग्रह होता .परंतु रस्त्यांची अवस्था इतकी बिकट होती कि कलेक्टर साहेबांनी खराब रेपोर्ट दिला तर दौरा रद्द होणार होता त्या मूळे जनसमुदायाने बाबांची परवानगी घेऊन श्रमदानाने रस्ता करण्याचे काम हाती घेतले. साहेब व्यवस्था पाहण्यासाठी आले .लोकांनी त्यांना गडावर आणले.भगवान बाबाची भेट घडवून दिली.बांधेसूद व्यक्तिमत्व ,करारी नजर, अचाट वक्तृतव आणि तेवढेच आपुलकीचे प्रेमाचे आदरातिथ्य यांनी खुद्द कलेक्टर साहेब भारावून गेले. बाबांनी साहेबाना सर्व गड फिरवून दाखवला.कार्यक्रमाची नियोजीत जागा दाखवली. सभामंडप, व्यासपीठ ,श्रमदानातून तयार केलेले रस्ते दाखवले.जनसमुदायासाठी केलेली सोय दाखवली. पाण्याची सोय केल्याचे दाखवले. हे सर्व वैभव बघताच कलेक्टर साहेब खुश झाले दौऱ्यासाठी " All Right "असा शेरा दिला .

सोहळ्याचा दिवस उजडला मंत्री महोदयाच्या स्वागताची तयारी प्रत्येक घरा गनिक होत होती . सणा वाराप्रमाणे घराच्या समोर रांगोळ्या घातल्या गेल्या होत्या.उत्साहाचे वातावरण होते . ढोल ,ताशे लेझीम पथके घेऊन परिसरातील मंडळीनी मंत्रीमोहोदयाचे स्वागत केले. भक्ती रसाचा नगारा अवघ्या पंचक्रोशीत दुमदुमला. बैलगाड्या, टांगे नाही तर पायीच जमेल तसे लोक गडावर जमा झाले होते. शेकडो लोक जमा झाले होते बैठक व्यवस्था कमी पडू लागली .पण जनसमुदयाची काळजी घ्यायला पंचमाहाभूतानी मदत केली, भर उन्हाळ्यात भर दुपारी आकाशात ढग दाटून आले शिरवळ पडले जनसमुदायास उन्हाचा अजिबात त्रास झाला नाही. निर्मल मानाने केलेल्या कार्यास नियतीचाही हातभार असतोच हे अजून एकदा सिद्ध झाले .

मा. मुख्यमंत्र्यांनी भाषणात गडास भक्तीचा गड "भगवान गड " म्हणून ओळखला जावा असे सुचविले, सर्व जनसमुदायास आनंद झाला .धौम्य गडाचा "भगवान गड" झाला, आणि भक्तीचा अखंड झरा वाहू लागला.


श्री क्षेत्र भगवानगड||

No comments:

Post a Comment

JAY BHAGWAN

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा

श्री संत भगवान बाबा पालखी सोहळा