भगवानगडाचे उत्तराधिकारी
भीमसिंह महाराज (जन्म - इ.स. १९२३ नेकनूर, बीड मृत्यू -९ नोव्हेंबर, इ.स. २००३) हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व कीर्तनकार होते. भगवानबाबांच्या मृत्यूनंतरभगवानगडावरील भगवानबाबांच्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून १९ जानेवारी, इ.स. १९६५ पासून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराच्या शिखराचे काम केले.
गुरुवंश परंपरा
नारायण
ब्रह्मदेव
अत्री ऋषी
दत्तात्रेय
जनार्दनस्वामी
संत एकनाथ
गावोबा किंवा नित्यानंद
अनंत
दयानंद स्वामी पैठणकर
आनंदॠषी
नगदनारायण महाराज
महादेव महाराज (पहिले)
शेटीबाबा (दादासाहेब महाराज)
गोविंद महाराज
नरसू महाराज
महादेव महाराज (दुसरे)
माणिकबाबा
भगवानबाबा
भीमसिंह महाराज


















जीवन
भीमसिंह महाराजांच्या वडिलांचे नाव निहालसिंह तर आईचे नाव तुळजाबाई होते. त्यांनी आळंदीस वारकरी शिक्षणसंस्थेत गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला.
दिनांक १९ जानेवारी, इ.स. १९६५ यादिवशी भगवानबाबा यांचे निधन झाले. उत्त्तराधिकारी नेमल्याशिवाय त्यांचा पुढील विधी करता येत नव्हता त्यामुळे भगवानबाबांचे आवडते शिष्य म्हणून भीमसिंह महाराज यांना गादीवर बसण्याची विनंती केली गेली परंतु भीमसिंह महाराजांनी 'आपली भगवानबाबांच्या गादीवर बसण्याची लायकी नाही' असे म्हणून गादीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे भगवानबाबांचे परममित्र बाबुलाल महाराज पाडळीकर यांनीसोनोपंत दांडेकर यांच्याकडे जाऊन आज्ञापत्र आणले. ते आज्ञापत्र पाहिल्यावर भीमसिंह महाराज गादीवर बसण्यास तयार झाले व भगवानबाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली.
संतश्रेष्ठ भीमसिंह महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची क्रांती केली. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले. चालू असलेल्या अनिष्ठ रुढी, परंपरा, अंधश्रद्धा बंद केल्या. [२]
समाजप्रबोधन करून गुरुवर्य (वै.) भीमसिंह महाराज यांच्या सहकार्याने मच्छिंद्रगड शिरूर कासार येथील पशुहत्या पूर्णपणे बंद करण्यात आली. भिमसिंह महाराजानंतर डाँ.नामदेव महाराज शास्री सानप हे महंत झाले.
भीमसिंह महाराजच्या मृत्यूनंतर नामदेवशास्त्री सानप यांची दुसरे उत्तराधिकारी म्हणुन निवड झाली. भगवानबाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचे काम केले. नामदेवशास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व थोर कीर्तनकार आहेत. तेथून पुढे गडाचा विकास वाढीस लागला. गडावर अनेक सुविधा झाल्या. नामदेव महाराजांनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापीठाची स्थापना केली. नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. गडातर्फे प्रत्येक गावात मासिक अन्नदान चालू आहे. हे सर्वकाम लोकवर्गणीतून होत आहे. येथे येण्यार्या भाविकांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय केली जाते. येथे श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट कार्यरत आहे
गुरुवंश परंपरा
नारायण
ब्रह्मदेव
अत्री ऋषी
दत्तात्रेय
जनार्दनस्वामी
संत एकनाथ
गावोबा किंवा नित्यानंद
अनंत
दयानंद स्वामी पैठणकर
आनंदॠषी
नगदनारायण महाराज
महादेव महाराज (पहिले)
शेटीबाबा (दादासाहेब महाराज)
गोविंद महाराज
नरसू महाराज
महादेव महाराज (दुसरे)
माणिकबाबा
भगवानबाबा
भीमसिंह महाराज
नामदेवशास्त्रीश्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी ६० फूट उंच महाद्वार, सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते.श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेतल्यावर बरीच विकासकामे केली आहेत. स्वयंपाकगृह, महिलांसाठी धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, कीर्तन हॉल, संत विद्यापीठ, कीर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग वगैरे. अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.



















श्री क्षेत्र भगवानगडावर 25 कोटींची विकासकामे पूर्ण झाली आहेत. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असणाऱ्या भगवानगडाचा राज्यभर विस्तार करण्याचा संकल्प संस्थानने केला होता. त्यानुसार सुरवातीला आळंदी, पंढरपूर येथे गडाच्या शाखा सुरू करण्यात आल्या.
I want to contact number
ReplyDelete